प्रेषितांचीं कृत्यें Chapter 26 MARIRV Bible Verse Images

प्रेषितांचीं कृत्यें 26 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share प्रेषितांचीं कृत्यें 26 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


प्रेषितांचीं कृत्यें 26:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
अग्रिप्पा पौलाला म्हणाला, “तुला तुझी बाजू मांडायला परवानगी आहे.” यावर पौलाने आपला हात उंच करून आपल्या बचावाचे भाषण सुरू केले.

प्रेषितांचीं कृत्यें 26:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
अग्रिप्पा महाराज, मी स्वतःला धन्य समजतो कारण यहूद्यांनी आपल्यासमोर माझ्याविरुद्ध केलेल्या आरोपांचा बचाव करण्याची संधी आज मिळाली.

प्रेषितांचीं कृत्यें 26:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
विशेषत, यहूदी चालीरीति आणि प्रश्न इत्यादी गोष्टींची आपणांला चांगल्या प्रकारे माहिती असल्याने तर हे जास्तच खरे म्हणावे लागेल, तेव्हा आपण माझे बोलणे धीराने ऐकून घ्यावे अशी मी विनंती करतो.

प्रेषितांचीं कृत्यें 26:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी माझे जीवन तरुणपणापासून माझ्या प्रांतात व यरूशलेम शहरात कशा रीतिने जगत आलो हे सर्व यहूदी लोकांस चांगले माहीत आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 26:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते मला बऱ्याच काळापासून ओळखतात आणि त्यांची इच्छा असेल तर मी एक परूशी म्हणजे आमच्या यहूदी धर्माच्या एका कट्टर गटाचा सभासद या नात्याने कसा जगत आलो याविषयी ते साक्ष देऊ शकतील.

प्रेषितांचीं कृत्यें 26:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आता देवाने आमच्या पुर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी उभा आहे;

प्रेषितांचीं कृत्यें 26:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करीत आहेत, महाराज, तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहूद्यांनी आरोप ठेवला आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 26:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
देव मरण पावलेल्यांना परत उठवितो, असे तुमच्यापैकी कित्येकांना विश्वास ठेवण्यास अयोग्य का वाटावे.

प्रेषितांचीं कृत्यें 26:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
नासरेथच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते.

प्रेषितांचीं कृत्यें 26:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि नक्की हेच मी यरूशलेम शहरात केले, कारण मुख्य याजकांकडून मला तसा अधिकार मिळाला होता, म्हणून मी देवाच्या अनेक संतांना तुरुंगात टाकले आणि हे जे संतगण जिवे मारले गेले, त्यांच्याविरुद्ध मी माझे मत नोंदविले.

प्रेषितांचीं कृत्यें 26:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
अनेक सभास्थानात मी त्यांना शिक्षा केली आणि देवाविरुद्ध जबरीने वाईट भाषण करायला लावण्याचा मी प्रयत्न केला, या लोकांवरील माझा राग इतक्या पराकोटीला गेला होता की, मी त्यांचा छळ करण्याकरता इतर शहरांमध्ये देखील जात असे.

प्रेषितांचीं कृत्यें 26:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
एकदा दिमिष्क शहराला जाण्यासाठी मुख्य याजकांनी मला अधिकार व परवानगी दिली तेव्हा महाराज.

प्रेषितांचीं कृत्यें 26:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
वाटेत भर दुपारच्या वेळी मी माझ्या व माझ्यासमवेत असणाऱ्यांच्या भोवती स्वर्गीय प्रकाश फाकलेला पाहिला, तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता.

प्रेषितांचीं कृत्यें 26:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आम्ही सर्व खाली जमिनीवर पडलो आणि इब्री भाषेत माझ्याशी बोलताना एक वाणी मी ऐकली, ती वाणी म्हणाली, “शौला, शौला, माझा छळ तू का करतोस? अणकुचीदार काठीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 26:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि मी म्हणालो, ‘प्रभू, तू कोण आहेस?’ प्रभूने उत्तर दिले, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस.

प्रेषितांचीं कृत्यें 26:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आता ऊठ आणि उभा राहा! या कारणांसाठी मी तुला दर्शन दिले आहे तुला सेवक म्हणून नेमावे व जे काही तुला दाखविले व जे दाखवीन त्याचा साक्षीदार म्हणून तुला नेमावे.

प्रेषितांचीं कृत्यें 26:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन.

प्रेषितांचीं कृत्यें 26:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून निघून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.”

प्रेषितांचीं कृत्यें 26:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
यासाठी, अग्रिप्पा महाराज मला जो स्वर्गीय दृष्टांत झाला, त्याचा मी आज्ञाभंग केला नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 26:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
उलट पहिल्यांदा दिमिष्कातील आणि नंतर यरूशलेम शहरातील, यहूदीया प्रांतातील सर्व आणि परराष्ट्रीय लोकांससुद्धा प्रभूच्या वचनाची साक्ष दिली, त्यांनी पश्चात्ताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चात्तापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले.

प्रेषितांचीं कृत्यें 26:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
या कारणांमुळे मी परमेश्वराच्या भवनात असताना काही यहूदी लोकांनी मला धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

प्रेषितांचीं कृत्यें 26:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे, जे काही पुढे होणार होते, त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 26:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्यानुसार देवाचा अभिषिक्त जो ख्रिस्त तो दुःखसहन करील आणि मरण पावलेल्यातून उठविला जाणाऱ्यांत तो पाहिला असेल, यहूदी लोकांस तसेच परराष्ट्रीयांनाही देव प्रकाशाची घोषणा करील.

प्रेषितांचीं कृत्यें 26:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौल आपल्या बचावासंबंधी बोलत असताना फेस्त त्यास मोठ्याने म्हणाला, “पौला, तू वेडा आहेस, जास्त ज्ञानामुळे तुला वेड लागले आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 26:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौलाने उत्तर दिले, “फेस्त महाराज, मी वेडा नाही; तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत, त्यांच्याविषयीच मी बोलत आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 26:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
येथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणाने बोलू शकतो, त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल, असे मला खात्रीने वाटते, मी हे म्हणतो, कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 26:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
अग्रिप्पा महाराज, संदेष्ट्यानी जे लिहिले त्यावर तुमचा विश्वास आहे काय? तुमचा त्यावर विश्वास आहे.” हे मला नक्की माहीत आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 26:28 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
यावर अग्रिप्पा म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात ख्रिस्ती होण्यासाठी तू माझे मन वळवू शकशील असे तुला वाटते काय?”

प्रेषितांचीं कृत्यें 26:29 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौलाने उत्तर दिले, “थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा, मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत त्या सर्वांनी माझ्यासारखे या साखळदंडाखेरीज, विश्वास ठेवणारे व्हावे, अशी माझी देवाला नम्र विनंती आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 26:30 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
यानंतर राजा, बर्णीका, राज्यपाल आणि त्यांच्याबरोबर इतर जे तेथे बसले होते, ते सर्व उठले.

प्रेषितांचीं कृत्यें 26:31 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते न्यायालयातून बाहेर पडल्यावर एकमेकांशी बोलत होते, ते म्हणाले, “ज्यामुळे तुरुंगवास किंवा मरणदंड द्यावा असे काहीही या मनुष्याने केले नाही.”

प्रेषितांचीं कृत्यें 26:32 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर त्यास सोडून देता आले असते.”

Available Bible Translations

American Standard Version (ASV)
Acts 26 (ASV) »
King James Version (KJV)
Acts 26 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Acts 26 (GW) »
Berean Bible (BSB)
Acts 26 (BSB) »
World English Bible (WEB)
Acts 26 (WEB) »
French Bible (LSG)
Actes 26 (LSG) »
Portuguese Bible (BSL)
Atos 26 (BSL) »
Spanish Bible (RVA)
Hechos 26 (RVA) »
Italian Bible (RIV)
Atti 26 (RIV) »
Chinese Simplified (CUVS)
使 徒 行 传 26 (CUVS) »
Chinese Traditional (CUVT)
使 徒 行 傳 26 (CUVT) »
Russian Bible (RUSV)
Деяния 26 (RUSV) »
Ukrainian Bible (UKR)
Дії 26 (UKR) »
Hungarian Bible (KAR)
Apostolok 26 (KAR) »
Bulgarian Bible (BULG)
Деяния 26 (BULG) »
Japanese Bible (JPN)
使徒行伝 26 (JPN) »

प्रेषितांचीं कृत्यें (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List